प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Feb 8, 2007

जिव माझा तुझ्यात होता


जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची.

जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.

जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.

जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता.

सुधीर .......

मनापसुन ....... मनापर्यतं ........

4 comments:

Anonymous said...

thanks,

मुलिन्च्या मनाला ओलखु शकल्या बद्द्ल

Anonymous said...

khup chaan kavita ahe....

tanvi said...

really nice poem.. keep it up

tanvi said...

really nice poem.. keep it up