Feb 8, 2007
मी कोण
इथे सारेच कलाकार मी कोण आहे
माझी किमंत काय कोणला जाण आहे
सारेच बहरलेत इथे हिरवळीत हिरव्या
मी कोण, सुकलेलं एक पिपंळ पान आहे.
इथे सारेच कामवाले मीच बेकार आहे
इथे सारेच आवरलेले मीच सुटार आहे
सारेच सुखावलेत इथे शब्दा शब्दांनी
मी कोण, निशब्द शब्दाचा उकार आहे.
इथे सारेच जिकंलेले मीच हरणारा आहे
इथे सारेच हसणारे मीच रडणारा आहे
सारेच हसतात इथे उगाच मोठेपणासाठी
मी कोण, शब्दा शब्दातुन आसवे गाळणारा आहे.
इथे सारेच यशस्वी मीच अपयशी आहे
इथे सारेच र्निदोष मीच अपराधी आहे
सारेच जगतात इथे आनदांत मनभरुन
मी कोण, दुखाःच्या नावेचा खलाशी आहे.
इथे सारेच यात्री मीच वनवासी आहे
इथे सारेच प्रतिसादी मीच अभिलाशी आहे
सारेच तड्पतात इथे ज्या अमुल्य आसवांसाठी
मी कोण, मी त्या आसवांचा जुना प्रवासी आहे.
सुधीर ............
मनापासुन ........... मनापर्यतं ..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment