प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Nov 30, 2007

किनारे. (गझल)

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
आसवे गाळून परत फ़िरले किनारे.

आयुष्यात एकरुप असुन सागराशी
दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे.

मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती
शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे.

वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा
सागरा घेऊन कुशित निजले किनारे.

साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत
संपण्याआधीच जिव हरले किनारे.

आज येऊदे प्रलय अचल मी उरेन
ठोकुन छाती मग गडगडले कीनारे.

पापण्यांती घेउन जखम जगी जगलो
निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

डोळ्यात गळून गेली (गझल)

वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग
****************************

आत्ताच डोळ्यात गळून गेली
जी आठवांना विसरून गेली.

होते अश्रू नीकट काळजाच्या
डोळ्यात सारे भिजवून गेली.

मी जागुन आयुष्य काढलेले
ही रात्र झोपेत गिळून गेली.

होतो मि तीथेच समोर तीच्या
ती मान मागे वळवून गेली.

हा दोष मी आज कुणास द्यावा
दोषी मला ती ठरवून गेली.

शब्दास आता रडु आवरेना
काव्यास माझ्या रडवून गेली.

झालो मि आता निवडूंग वेडा
तीही गुलाबात दगूंन गेली.

सुधीर ...

मनापासुन ........ मनापर्यंत ............

सरलो नभात (गझल)

वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग
****************************

आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.


सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

सरणात होतो (गझल)

वृत्त - उपेंद्रवज्रा , गण - ज त ज ग ग
***************************

निवांत माझ्या सरणात होतो
नितांत तीच्या स्मरणात होतो.

भवीष्य माझे भरडून गेले
मि नीयतीच्या दळणात होतो.

उधाण लाटा उधळून गेल्या
मि वादळाच्या वळणात होतो.

उशीर झाला कळण्यास तीला
कळाल तेव्हां मसणात होतो.

भरून गेल्या जखमा कधीच्या
उरून मी फ़क्‍त वणात होतो.

फ़िरून वाटा ह्र्दयात वेडया
अखेर तीच्या चरणात होतो.

सुधीर ....

मनापासुन ............ मनापर्यंत ............

ह्र्दयात नकार होते (गझल)

तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

काव्यात

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली

मी तर पाकळ्यांची आस केली
बनुन सडा पारीजात ती आली

रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां
सोडून तीची पाउलवाट ती आली

बुडता बुडता किनारा गवसला मला
होऊन माझा आधार लाट आली

आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला
घेऊन मग मेघातुन बरसात ती आली

आजवर या कुट्ट काळोखात जगलो
होउन प्रकाश घरी साजंवात ती आली

आसवात कधी आभाळ पाहील नाही
उधळून चादंण्यात चादंरात ती आली

कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो
रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली

हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा
होऊन हिरवळ या श्रावणात ती आली.

सुधीर ......

मनापासुन ...... मनापर्यंत ......

निर्दयी ...

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

सुधीर ..........

मनापासुन ............ मनापर्यंत .............

डोळ्यातून ओतलो इथे.

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.

सुधीर .....

मनापासून ........... मनापर्यंत ............

मी आभारी आहे ....

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

सुधीर ....

मनापासुन ........... मनापर्यंत ...........

फ़क्‍त तुझ्यासाठी .

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

सुधीर ......

मनापासुन ........ मनापर्यंत .........

सार गाव ......

आज सार गाव माझ्यावर हसत होत
प्रत्येकजण पाहून तोडं वळवत होत.

प्रेम केल ही एकच चुक होती माझी
मी काय करू प्रेम तर नकळत होत.

काल आरश्यात पाहताना बर वाटल
कोणी तरी घरात मला ओळखत होत.

कुणा दिसल्या नाहीत जखमा मझ्या
वेदनेतुन एकटं काळीज ओघळत होत.

धुर कसा विझणार आग विझली तरी
सार स्वप्नं माझ त्या धुरात जळत होत.

चुल कशी पेटवू जेव्हां पेटेनाच निखारा
मग कळाल तीच्यासाठी घरही गळत होत.

त्या प्राजक्‍तासही झॊप नाही आली कधी
तेही तुझ्यासाठी रात्र भर सळसळत होत.

आजवर नव्हतो झालो नापास मी कधी,
पण पुस्तकाच एक एक पान निकळत होत.

आता हा निवंडूग जगतो एकटा वाळवटांत
काय करू भविष्य ह्या उनात तळपळत होत.

सुधीर ....

मनापासुन ........... मनापर्यंत ...........

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी
अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी

तुझ्यावेळी त्यांनी गच्च डोळे मिटले
क्रातींकारी म्हणून तुला दुर लोटले
अहिंसेचे ते पुतळे तेव्हां पुरते झोपले
अफ़झलसाठी मात्र तत्व सोडुन नाचले

तुही तेच केल होत जे त्याने केल
तु देशासाठी केल त्या देश द्रोह्यांसाठी
तेव्हां तुला मिळाली फ़ाशीची क्षिशा
त्याच्यासाठी मागतात माफ़ीची दिक्षा.

म्हणे बेकार तुझा आत्मा होता
देशात तो एकच महात्मा होता
असा जागतेपणे डोळे झाकणारा
तोच ना आमचा पिता होता.

त्याचेच भक्त आज असे वागतात
त्याच्या विचारांना मातीत पुरतात
तुझ्या बलिदानाला दिलि मुठ माती
अफ़झलची करणी म्हणे एक चुक होती.

माझ्यासाठी तु एकच महात्मा
किचांळतोय क्रांतीचा प्रत्येक आत्मा
अहींसेच्या पुतळ्यांनीच केला आहे
या देशात क्रांतीच्या विचारांचा खात्मा.

तुझा इतिहासा अर्धा पानात लिहिला
या देशात क्रांती विरांचा इतिहास हरवला
कोणाला कळाल नाही क्रांतीच बलीदान
तोच अहीसेचा धडा ह्या पुस्तकांनी गिरवला.

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी
अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी

सुधीर .....