प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Feb 8, 2007

मावळत्या आशेवर मी उभा


मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.

पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.

ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.

तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडे
कोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडे
इथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारण
तुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.

सुधीर ......

मनापासुन ....... मनापर्यतं ..........

1 comment:

Anonymous said...

Sudhir mitra jinkals he man tujhya kavitani.
kharach mi tujhya kavitancha deewana jhaloy. kavita vachun vachun tond ani dole donhi thakale pan man matra thakat nahi ajun.
kharach phar chhan lihitos tu.