प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Apr 24, 2008

माप.... ( गझल)

नशीबात माझ्या तुझे कोप आहे
असे कोणते भोगतो पाप आहे.

तुही आठवांना दुरी लोटलेले
तरी आसवांचा मला ताप आहे.

कशी गुंतली आज गाण्यात माझ्या
तुझे नाव हे, एक आलाप आहे.

जरी रात्र ही काढली जागता मी
जगी चांद्ण्याच्या कुठे झोप आहे.

तिमीरात होते जरी पाप देवा
इथे देवळात तुझा जाप आहे.

म्हणे आसवांच्या द-या दाटलेल्या
अश्रू मोजणारे कुठे माप आहे.

सुधीर ....

मनापासुन ...... मनापर्यंत ......

पाकळ्या .... ( गझल)

किना-या वाचून ह्या जगल्या नाही
कधीही लाटा कुठे निजल्या नाही.

सरी डोळयातून ओघळल्या तुझ्या
सखे माझ्या पापण्या भिजल्या नाही.

तुही त्या चंद्रावरी जिव साडंला
तिथे लाखो चांदण्या विझल्या नाही.

फ़ुलाच्या कानात आठवणी सा-या
तुझ्यासाठी पाकळ्या कुजल्या नाही.

सदा शब्दांचा श्रुगांर तुझ्यासाठी
( तरी माझ्या गझला सजल्या नाही.)

अगंणी ह्या पेरला निवडूंग हा
बिया कूपंणातही रुजल्या नाही.

सुधीर .......