Feb 8, 2007
कल्पनांचा पूर
कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.
कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.
कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.
भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.
सुधीर.......
मनापासुन............ मनापर्यतं .............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment