Feb 8, 2007
उद्या जगेन
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जिवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास
मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?
एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज
तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणी एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी
बघ आजही तरी तुला चीतां पुन्हां त्या उद्याचीच
दंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.
सुधीर..........
मनापासुन.................. मनापर्यतं..................
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
sudhir.......
your the best......
Post a Comment