Feb 8, 2007
आसवांच्या थेबांपरी मी
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालो
काय दोश माझा मी या वादळांत मिळालो
खरतर दोश तुझा नाही चुक माझीच होती
नेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.
अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललो
लागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलो
प्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होती
खरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.
प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलो
तु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलो
शेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस
मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.
तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलो
तुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलो
पण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हां
लक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
सुधीर .....
मनापासुन .......... मनापर्यतं ...........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment