Feb 8, 2007
आकांत
ही कविता एका नदीचा आकांत आहे
या अहो घाला घाव कुणी फ़ोडा हा बाधं
होऊद्या मुक्त मला पाहूद्या सागरकाठची साजं
नातं आमचं फ़ार जुन युगा युगात महान
मला भेटूद्या सागरा लागली सागराची तहान.
डोगंर द-याचे मला निरोप द्यायचे आहेत
डोळे भरुन त्याला पुन्हां पहायचे आहे
कुशीत शीरुन त्याच्या मनसोक्त रडायचे आहे
काही झाले तरी ही सरीता सागराचीच आहे.
तुमचं शिवारं पीकण्यासाठी मी माझी शिवर गाळतेय
तुमची तहान भागण्यासाठी मी कारावास भोगतेय
वा रे माणसा वा हीच तुझी माणूसकी का रे
तुझ्या प्रकाशासाठी मी इथे काळोखात राहतेय.
माझ्या वाटा बदं करुन तुमची घर सजवलीत
ओघळत्या आसवांवर माझ्या तुम्ही पीकं रुजवलीत
आता तरी जाऊदे मला हे जिवन सपंण्याआधी
या फ़ाटक्या चादरीची आता सारी ठिळगं उसवलीत.
हात जोडते पाया पडते बघा आली मी शरण
मुक्त करा मला या कोणी तरी तोडा हा धरणं
सपंण्याआधी आता तरी लाभुदे सौभाग्य मला
एक इच्छा माझी येवो मला सुवासीनीच मरण.
सुधीर .....
मनापासुन............. मनापर्यत..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
another gorgeous poem.
hey nice poem....
Post a Comment