प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Feb 8, 2007

कीती पाखंरे जळाली


कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.

सुधीर .....

मनापसुन .......... मनापर्यतं ..........

1 comment:

Rhuturaj said...

खूप छान लिहितोस? मनात खूप खोलवर जातात तुझे शब्द....मला माझ्याच भावना शब्दरूप घेवून समोर आल्यासारखे वाटते.....माझ्या एकांताचा आधार आहेत तुझ्या कविता....आणी त्यासाठी मी आभार मानतो तुझे....नाहीतर ह्या एकटेपणाने कदाचित जिवच घेतला असता...तू असेच लिहित रहवेस अशीच श्री चरनी प्रार्थना
तुझा शुभचिंतक
ऋतुराज