प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Feb 8, 2007

प्रेमात दुःखाचे महल


प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.

ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.

तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.

सुधीर ..........

मनापसुन .......... मनापर्यंत .............

2 comments:

Anonymous said...

Tuzi hi kavita vachn mazya sudha kahi aathvani tajya zalya:-) Olakhale mala

priya said...

tula koni daga dila asel he mala mahit nahi , pan jar ticha jaagi me aste tar, swatach jiv dila asta pan tula kadhi dukhavle naste,, love u