वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग
****************************
आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.
तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.
तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.
हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.
ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.
दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.
सुधीर ...........
मनापासुन ............ मनापर्यंत ............

प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........
Nov 30, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment