प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Nov 30, 2007

सार गाव ......

आज सार गाव माझ्यावर हसत होत
प्रत्येकजण पाहून तोडं वळवत होत.

प्रेम केल ही एकच चुक होती माझी
मी काय करू प्रेम तर नकळत होत.

काल आरश्यात पाहताना बर वाटल
कोणी तरी घरात मला ओळखत होत.

कुणा दिसल्या नाहीत जखमा मझ्या
वेदनेतुन एकटं काळीज ओघळत होत.

धुर कसा विझणार आग विझली तरी
सार स्वप्नं माझ त्या धुरात जळत होत.

चुल कशी पेटवू जेव्हां पेटेनाच निखारा
मग कळाल तीच्यासाठी घरही गळत होत.

त्या प्राजक्‍तासही झॊप नाही आली कधी
तेही तुझ्यासाठी रात्र भर सळसळत होत.

आजवर नव्हतो झालो नापास मी कधी,
पण पुस्तकाच एक एक पान निकळत होत.

आता हा निवंडूग जगतो एकटा वाळवटांत
काय करू भविष्य ह्या उनात तळपळत होत.

सुधीर ....

मनापासुन ........... मनापर्यंत ...........

1 comment:

PREM said...

Dear Sudhir,

Tumchi kavita far chan aahe. Mala khup aavadli.

Keet it up & great job done.

Sudhir I am also Computer Hardware & Network engineer and working in HP invent.I want to talk with you.Can you please send the mail on my personal email ID.so that i can talk with you.

Requesting you to kindly send your poem on my personal email ID:-
yash.penkar@gmail.com

@WISH YOU ALL THE BEST FOR FUTURE@