वृत्त - उपेंद्रवज्रा , गण - ज त ज ग ग
***************************
निवांत माझ्या सरणात होतो
नितांत तीच्या स्मरणात होतो.
भवीष्य माझे भरडून गेले
मि नीयतीच्या दळणात होतो.
उधाण लाटा उधळून गेल्या
मि वादळाच्या वळणात होतो.
उशीर झाला कळण्यास तीला
कळाल तेव्हां मसणात होतो.
भरून गेल्या जखमा कधीच्या
उरून मी फ़क्त वणात होतो.
फ़िरून वाटा ह्र्दयात वेडया
अखेर तीच्या चरणात होतो.
सुधीर ....
मनापासुन ............ मनापर्यंत ............

प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........
Nov 30, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Its awesome
Post a Comment