Mar 13, 2007
आज झाली पुन्हां माती
आज झाली पुन्हां माती ही जड
आज ओलावली पुन्हां पापण्यांची कड
माझ्या शब्दांनी सुध्दा तिचे डोळे भिजले
आसवांसाठी ही आशी काळजाची तडफ़ड.
आज भिजला पुन्हां तो चद्रं तो माझा
अश्रुंच्या चादंण्यात मग झाला तो वजा
नाही लपवु शकला स्वतःला तो आज
मग घेतली त्याने काही वेळेची रजा
दुःखं समजायला आसवांची का गरज
शब्दही सांगतात आणखी काही बरचं
कस पेलणार वजन शब्दांच त्या मनाला
जड झाली होती माती आज खरंच
सुधीर .....
मनापासुन ......... मनापर्यंत .........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment