प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Mar 13, 2007

नियतिने सुड हा


मडंळी ही कविता त्या हजारो शेतक-याची कथा आहे
ज्यांनी देहाला सपंवले तरी आत्म्याला शांती नाही.....

आता मी सुटलो आता माझ्या संसारी नाही
आता मी सुटलो आता मी कर्ज बाजारी नाही
आता मी मुक्‍त आहे पण तरी झॊप नाही
माझ्या लेकरांना कोणी इथे कोणी बाप नाही

फ़ाटलं आभाळ सार पण पाण्याचा थेबं नाही
कधी साडंल तर इतक साडंल की थाबांयच नाव नाही
माझी धरणी माय माझ्या म्रृत्यूला कार झाली
कधी पाण्यासाठी कधी भरपाण्यांत बोलायची सोय नाही

सर्जा राजाही माझे उपाशी मग मी का भाकरी खावी
देणेकरांची वरात तलवारीसह रोज दारात माझ्या यावी
आता सरकारी येतात आनिक पचंनामा करुन जातात
आत्म्याच्या मोलाची जाण नाही त्यांनी देहाची किमंत करावी

ती ही रडते आहे पाहून माझ्या सुकलेल्या कणसाकडे
शाळा शीकायचि होती आता जातो तो कोरड्या मळ्याकडे
ती चिमुलकली माझी रोज विहीरीत त्याच डोकावते
बाप गेला तिथुन येइल म्हणून एकटक डोळे तिचे रहाटाकडे.

आज मेल्यानतंरही मि असा कर्जात माझ्या बुडालेला
मुक्‍तीसाठी हा जिव माझा त्या आभाळात उडालेला
सरकार म्हणते कारण दुसरच होत माझ्या आत्महत्तेच
ही माझीच कहाणी नाही कितीकांवर नियतिने सुड हा उगावलेला.

सुधीर ........

No comments: