प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........
Mar 13, 2007
तो रस्ता मला पाहून
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी
तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत
पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच
उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...
सुधीर .....
नापासुन ......... मनापर्यंत .........
तिने श्राप दिलाय
माझ्या कविताना तिने श्राप दिलाय
की त्या नेहमी अश्याच रडंत रहतील
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
कविता रडल्या तरी डोळे शातं रहतील.
माझ्या कवितंना तिने श्राप दिलाय
की त्या कधीच पुर्ण होणार नाहीत
आज त्या पुर्ण करण्यात वेळ जाते
तुझी आठवण तरी मला येत नाही
माझ्या कवितानां तिने श्राप दिलाय
की त्या कधी कोणाला आवडणार नाहीत
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
सगळ्यानां कळाल तु मला फ़सवल ते
आणी खरोखर ते कोणालाच आवडलेलं नाही
सुधीर ...........
मनापासुन .......... मनापर्यंत ...........
यदां तरि आणा तो
आता पुन्हां आशा आम्हांला त्या स्वप्नांची
भारत जिकेलं विश्व कप ही आस्था या मनाची
आता पुन्हां आम्ही करणार तेच मागचे दावे
काही होऊदे गेल्या वेळी जे झाले ते झाले.
लागली वादळाची चाहूल मनास थांग नाही
पाहुन आमचि तयारी बोलायचि सोय नाही
सारे महारथी आमच्याकडे अर्जुनासारखे
मागे वळू नका आता मागे पहायचे नाही
भले आमचे मन खुपदा इथे तुटले
आम्ही तुम्हांला सांगा कधी एकटे टाकले
आता लढायचे मन लावुन तुम्ही इथे
काही होऊदे उद्या आभाळ जरी हे फ़ाटले.
तुम्ही पैसा कमवा आम्हांला काही नाही
तुम्ही नाव मिळवा आम्हांला खंत नाही
एकच इच्छा आमच्या ह्या भोळ्या मनाची
काही झालं तरी आम्हांला यंदा हरायच नाही
अडीचशे करोड हात करतील प्राथना इथे
मिळेल तेहत्तीस कोटीचा आशीर्वाद तिथे
त्यांची लोक सख्यां नाही तेवढे देव आमचे
जिकणारं ना तुम्ही नवस करणांर आम्ही इथे
क्रुपा करा पण यदां तरि आणा तो विश्वकप
नाहीतर म्हणेल भारताला स्वप्नांळू जग
शेवटी आमच स्वप्नंही तुमच्याच हातात
मन तोडू नका आता नाहीतर बघा मग...
सुधीर ........
रंग बदलेस म्हणून
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.
उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस
"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"
बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील
"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.
पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.
सुधीर ....
मनापासुन ....... मनापर्यंत ........
तो क्षण निघून गेला
तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.
तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.
तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.
वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.
सुधीर .....
मनपासुन ...... मनापर्यंत .......
एक लढाई हरलो
एक लढाई हरलो म्हणून काय झालं
अजून युद्ध जिकंण तरी बाकी आहे
आज मागे पडलो म्हणून काय झाल
बरेच जण आज माझ्याही मागे आहेत.
कोण म्हणत "ती नाही म्हणून काय झाल
"तिच्या शीवाय इथे ब-याच जणी आहेत"
पण यालाच प्रेम म्हणतात का जगात
तु घाबरु नकोस मी आजही तुझाच आहे.
तु जवळ नसलीस म्हणून काय झाल
तुझ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत
पण आठवणीसोबत जगता येत का इथे
खरच आज हे एक खूप मोठ गणित आहे.
आज मी तुझा असलो म्हणून काय झाल
पण आज तु नक्की माझी आहेस का ?
मी पळवाटा मुळीच शोधत नाही कधी
हा पण तुझे सगळे मार्ग मोकळे आहेत.
सुधीर .......
मनापासुन ....... मनापर्यंत .........
आज झाली पुन्हां माती
आज झाली पुन्हां माती ही जड
आज ओलावली पुन्हां पापण्यांची कड
माझ्या शब्दांनी सुध्दा तिचे डोळे भिजले
आसवांसाठी ही आशी काळजाची तडफ़ड.
आज भिजला पुन्हां तो चद्रं तो माझा
अश्रुंच्या चादंण्यात मग झाला तो वजा
नाही लपवु शकला स्वतःला तो आज
मग घेतली त्याने काही वेळेची रजा
दुःखं समजायला आसवांची का गरज
शब्दही सांगतात आणखी काही बरचं
कस पेलणार वजन शब्दांच त्या मनाला
जड झाली होती माती आज खरंच
सुधीर .....
मनापासुन ......... मनापर्यंत .........
मी देईन कधी हाक
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?
खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?
तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?
कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?
सुधीर .....
मनापासुन ......... मनापर्यंत .........
राहीलयं काय आता
लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.
लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.
आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.
आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.
सुधीर ......
मनापासुन............... मनापर्यत..................
एक आठवण चाळून घे
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.
जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे
नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.
सुधीर ........
मनापासुन ........ मनापर्यंत .......
Subscribe to:
Posts (Atom)