मी कोण
इथे सारेच कलाकार मी कोण आहेमाझी किमंत काय कोणला जाण आहेसारेच बहरलेत इथे हिरवळीत हिरव्यामी कोण, सुकलेलं एक पिपंळ पान आहे.इथे सारेच कामवाले मीच बेकार आहेइथे सारेच आवरलेले मीच सुटार आहेसारेच सुखावलेत इथे शब्दा शब्दांनीमी कोण, निशब्द शब्दाचा उकार आहे.इथे सारेच जिकंलेले मीच हरणारा आहेइथे सारेच हसणारे मीच रडणारा आहेसारेच हसतात इथे उगाच मोठेपणासाठीमी कोण, शब्दा शब्दातुन आसवे गाळणारा आहे.इथे सारेच यशस्वी मीच अपयशी आहेइथे सारेच र्निदोष मीच अपराधी आहेसारेच जगतात इथे आनदांत मनभरुनमी कोण, दुखाःच्या नावेचा खलाशी आहे.इथे सारेच यात्री मीच वनवासी आहेइथे सारेच प्रतिसादी मीच अभिलाशी आहेसारेच तड्पतात इथे ज्या अमुल्य आसवांसाठीमी कोण, मी त्या आसवांचा जुना प्रवासी आहे.सुधीर ............
मनापासुन ........... मनापर्यतं ..........
No comments:
Post a Comment